केडीएमटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केडीएमटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू
केडीएमटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू

केडीएमटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू

sakal_logo
By

कल्याण, ता. १ (बातमीदार) : राज्यात आपली सत्ता आल्याने आपली कामे अडणार नाहीत, कर्मचारी वर्गाचे प्रश्‍‍न सरकार दरबारी मांडून केडीएमटी कर्मचारी वर्गाचे प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले.
केडीएमटी कर्मचारी वर्गाच्या विविध समस्या असून कामगार नेते आणि माजी नगरसेवक रवी पाटील यांनी शेकडो केडीएमटी कर्मचाऱ्यांसह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. विविध मागण्यांसमवेत केडीएमटीमधील ५९ वाहक कर्मचारी स्थायी करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे या प्रमुख मागण्यांसह या कामी शासन स्तरावर मंजुरी मिळण्‍याकडे लक्ष वेधले. खासदार शिंदे यांनी वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर तुमचे कोणतेही काम अडणार नाही, असे आश्वासन देत लवकरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91001 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..