महापालिका आयुक्तांना रहिवाशांचा गराडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका आयुक्तांना रहिवाशांचा गराडा
महापालिका आयुक्तांना रहिवाशांचा गराडा

महापालिका आयुक्तांना रहिवाशांचा गराडा

sakal_logo
By

भिवंडी, ता. १ (बातमीदार) : शहरातील अशोक नगर व गोपाळ नगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मालमत्ता कर भरूनही मुबलक पाणी मिळत नाही. त्याचबरोबर परिसरातील पथदिवेही बंद आहेत. स्वच्छता व जंतुनाशक औषध फवारणी होत नाही. त्यामुळे नाराज व संतप्त झालेल्या नागरिकांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना पिण्याचे पाणी, स्वच्छता, मोकळे चेंबर, बंद पथदिवे यासह विविध समस्यांबाबत निवेदन दिले आहे. या समस्यांच्या बाबत केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनासुद्धा तक्रारी करण्यात आल्यामुळे त्यांनी आयुक्तांना भिवंडीच्या समस्यांकडे लक्ष देण्याची सूचना केली आहे.
भिवंडी महापालिकेचे सभागृह नेते सुमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात भाजप जैन सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राकेश ओस्तवाल सहभागी झाले होते. महापालिका प्रशासनाकडून पिण्याचे पाणी पुरवठा करण्‍यासंदर्भात कोणतेही नियोजन होत नसल्याने अशोकनगर परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. पावसामुळे गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी अनियमित पाणीपुरवठ्यामुळे येथील नागरिकांना सतत टँकर व शुद्ध पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे. एमएमआरडीएने आरसीसी रस्ता तयार केल्यानंतर बहुतांश पथदिवे बंद आहेत. या भागातील गटार व नाल्यांची साफसफाई झालेली नाही, त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरत आहे. तसेच ड्रेनेज चेंबर उघडे आहे. त्यामुळे ड्रेनेजचे घाण पाणी वारंवार रस्त्यावर येते. त्यामुळे पादचारी नागरिकांना रस्त्यावर नाक मुठीत धरून जावे लागत आहे. महापालिकेच्या आरोग्य सफाई कर्मचाऱ्यांकडून साफसफाई नियमित केली जात नाही. घंटागाडी कचरा उचलण्यासाठी येत नाही, त्यामुळे या भागातील रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे विविध आजारसुद्धा पसरत आहेत. जंतुनाशक औषध फवारणी होत नसल्यामुळे मच्छर व माश्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
पाणीपुरवठा सुरळीत करावा
महापालिका आयुक्त प्रशासनाने समस्‍यांकडे लक्ष देऊन या परिसरात स्वच्छता मोहीम व राबवावी, तसेच नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी राकेश ओसवाल व सभागृह नेते सुमित पाटील यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91010 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top