सायन-पनवेल महामार्गावर प्रवास महागला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायन-पनवेल महामार्गावर प्रवास महागला
सायन-पनवेल महामार्गावर प्रवास महागला

सायन-पनवेल महामार्गावर प्रवास महागला

sakal_logo
By

पनवेल, ता.१ (प्रतिनिधी) ः सायन-पनवेल महामार्गावरील कामोठे-कोपरा टोल नाक्यावरील टोलच्या दरात सोमवार ( ता.१) पासून वाढ करण्यात आली आहे. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या मिनी बसला ९० रुपये, तर अवजड वाहनांना १९० रुपयांचा टोल भरावा लागणार असल्याने सामान्य वाहतूकदारांचा सायन-पनवेल महामार्गावरील प्रवास महागला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करोडो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या सायन-पनवेल महामार्गावरून पनवेलच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी खारघर-कोपरा येथे, तर मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी कामोठे येथे टोल नाका उभारण्यात आला आहे. या ठिकाणी खासगी टोल वसुली कंपनीच्या माध्यमातून टोल वसुली करण्यात येते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या या टोल नाक्यावर १ ऑगस्टपूर्वी प्रवास करणाऱ्या मिनी बस चालकांकडून एकेरी प्रवासासाठी ७५ रुपयांचा टोल वसूल करण्यात येत होता. आता या दरात वाढ झाल्याने एकेरी प्रवासासाठी ९० रुपये टोल भरावा लागणार आहे; तर ट्रक व बससाठी एकेरी प्रवासाला १९० रुपये टोल आकारला जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.
.........
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात आलेल्या टोल नाक्यावरील टोलच्या दरात दर तीन वर्षांत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला वाढ करण्यात येत असते. कामोठे कोपरा टोलनाक्यावरदेखील एप्रिल महिन्यात टोलच्या दरात वाढ होणे अपेक्षित होते. मात्र याबाबतचे नोटिफिकेशन उशिरा झाल्याने एप्रिल महिन्याऐवजी ऑगस्ट महिन्यात टोलच्या दरात वाढ झाली आहे.
- योगेश चौधरी, व्यवस्थापक, कामोठे-कोपरा टोल नाका.
........
पूर्वीचे आताचे दर ( एकेरी प्रवास )
मिनी बस - ७५ - ९०
ट्रक/बस - १६० - १९०

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91031 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..