पनवेल ग्रामीणमध्ये सिंगल युज प्लास्टिक बंदी कागदावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेल ग्रामीणमध्ये सिंगल युज प्लास्टिक बंदी कागदावर
पनवेल ग्रामीणमध्ये सिंगल युज प्लास्टिक बंदी कागदावर

पनवेल ग्रामीणमध्ये सिंगल युज प्लास्टिक बंदी कागदावर

sakal_logo
By

प्लास्टिक बंदी कागदावरच
पनवेल ग्रामीणमध्ये सर्रास वापर; ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष
नवीन पनवेल, ता. १ (वार्ताहर) ः पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सिंगल यूज प्लास्टिकवर १ जुलैपासून बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाची पनवेल महापालिका क्षेत्रातही अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, पनवेल ग्रामीणमध्ये ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे अशा प्रकारच्या प्लास्टिकचा सर्रासपणे वापर होत असल्याने ही बंदी कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.
पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाने धडक कारवाई केल्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांबरोबरच सिंगल यूज इतर प्लास्टिक मनपा क्षेत्रात आढळून येत नाही. मात्र याउलट स्थिती ग्रामीण भागात असून दुकानदार,भाजीवाले, खाद्यपदार्थ आणि फळविक्रेते त्याचबरोबर मटण आणि चिकन शॉपवरही सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपणे केला जात आहे. पनवेल महापालिकेच्या बाहेर विचुंबे, सुकापूर, पाली-देवद, कोप्रोली, नेरे, वाकडी, मोर्बे, पळस्पे, शिरढोण, पोयंजे या गावांमध्ये शहरीकरणामुळे लोकवस्ती वाढली आहे. येथे दुकानांची संख्याही अधिक आहे. बाजारपेठा विकसित झाल्याने या ठिकाणी सिंगल यूज प्लास्टिक वापर आजही सुरू आहे. ग्रामपंचायतींच्या अखत्यारित असलेल्या या परिसरामध्ये कारवाई करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही; तर कडक निर्बंध लादण्यासाठी ग्रामपंचायतीचे हात तोकडे पडत असल्याने बंदी असतानाही सिंगल यूज प्लास्टिक वापरले जात आहे.

‘या’ वस्तूच्या वापरावर कायद्याने मनाई
सिंगल यूज प्लास्टिकपासून बनविलेल्या १९ वस्तूंवर १ जुलैपासून सरकारने बंदी आणली आहे. त्यात प्लास्टिक स्टिक ईयर-बड, फुग्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक कांड्या, झेंडे, कॅण्डी, आइस्क्रिम स्टिक, सजावटीसाठी वापरले जाणारे पॉलिस्टाइनिन, प्लास्टिक प्लेट, कप, ग्लास, चमचे, काटे चमचे, चाकू, ट्रे, स्टरर, १०० मायक्राॅनहून कमी प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर, मिठाईच्या बॉक्सवरील प्लास्टिक, इन्हिटेशन कार्ड्स, सिगारेट पॅक अशा वस्तूंच्या वापरावर बंदी केलेली आहे. तसेच बंदीचे उल्लंघन केल्यास कलम १५ अन्वये त्याला दंड किंवा जेल किंवा दोन्ही अशी शिक्षा करण्याची तरतूद आहे.

कोट
पनवेलच्या ग्रामीण भागांमध्ये प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींना प्लास्टिक बंदीच्या संदर्भात दुकानदार व विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.
- संजय बोये, गटविकास अधिकारी, पनवेल.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91032 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..