निधी मंजूर झालेल्या कामांना सुरुवात करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधी मंजूर झालेल्या कामांना सुरुवात करा
निधी मंजूर झालेल्या कामांना सुरुवात करा

निधी मंजूर झालेल्या कामांना सुरुवात करा

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. २ (बातमीदार) : शहरातील निधी मंजूर झालेल्या विकासकामांची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. त्या कामांना सुरुवात करण्याबरोबरच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका हद्दीतील प्रभागनिहाय आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना दिल्या.

अंबरनाथ शहरात मंजूर करण्यात आलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार डॉ. किणीकर यांच्या उपस्थितीमध्ये मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्यासोबत सोमवारी (ता. १) बैठक घेत चर्चा केली. शहरातील निधी मंजूर झालेले महत्त्वाचे मोठे प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यात यावेत, पश्चिम भागातील डंम्पिंगबाबत कार्यवाही करून नागरिकांचा त्रास दूर करावा, नगरपरिषद हद्दीतील प्रत्येक वॉर्डनिहाय नागरिकांना आरोग्यविषयक व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, रेल्वे स्थानक परिसरात मंजूर करण्यात आलेले सॅटिसचे काम जलद गतीने मार्गी लावण्यासाठी निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी, यशवंतराव चव्हाण खुले नाट्यगृहाचे उर्वरित बांधकाम मंजूर करण्यात आलेल्या मूळ बांधकाम करण्यात यावे, अंबरनाथ पूर्व भागातील वेल्फेअर सेंटर, भाजी मार्केट यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात यावा, मुख्य रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाकरिता तातडीने निविदा प्रक्रिया राबवून कामे सुरू करण्यासाठी आमदार डॉ. किणीकर यांनी सूचित केले.

माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, प्रज्ञा बनसोडे, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख, उपशहरप्रमुख पुरुषोत्तम उगले, शिवाजी साळुंखे, संतोष शिंदे, सचिन गुडेकर, रवींद्र पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91057 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..