खारघर मध्ये स्वाईन फ्लूचा शिरकाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघर मध्ये  स्वाईन फ्लूचा शिरकाव
खारघर मध्ये स्वाईन फ्लूचा शिरकाव

खारघर मध्ये स्वाईन फ्लूचा शिरकाव

sakal_logo
By

खारघर, ता. १ (बातमीदार) : खारघर शहरात स्वाईन फ्ल्यूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. यामुळे पालिकेची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. खारघरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर आता पुन्हा एकदा स्वाईन फ्ल्यूचा रुग्ण आढळून आला आहे. एका ५२ वर्षीय व्यक्तीला स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याची माहिती मिळताच आरोग्य विभागाने संबंधित रुग्णाच्या परिसरात औषधफवारणी करून योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. आरोग्य विभागात विचारणा केली असता लागण झालेली व्यक्ती त्यांच्या घरी असून त्यांची प्रकृती ठीक आहे. तसेच डॉक्टरच्या सल्ल्यानुसार औषधे घेत आहे. कोरोना काळात खारघर वसाहतीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे स्वाईन फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या आरोग्य यंत्रणेसह नागरिकांनी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91078 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top