ओबीसी आरक्षणावर ३९ सूचना व हरकती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओबीसी आरक्षणावर ३९ सूचना व हरकती
ओबीसी आरक्षणावर ३९ सूचना व हरकती

ओबीसी आरक्षणावर ३९ सूचना व हरकती

sakal_logo
By

ओबीसी आरक्षणावर ३९ सूचना व हरकती
आज शेवटचा दिवस
मुंबई, ता. १  ः राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार महापालिकेच्या निवडणुकीकरिता २३६ प्रभागांपैकी निर्धारित जागांसाठीची आरक्षण निश्चिती व सोडत नुकतीच काढण्यात आली. आरक्षण सोडतीसाठी आतापर्यंत ३९ सूचना व हरकती आल्या असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. सूचना-हरकती दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून २ ऑगस्टची अंतिम मुदत देण्यात आली आहे. 
 
अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गांसाठी ३१ मे २०२२ च्या सोडतीनुसार आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या सोडतीमध्ये नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गाकरिता आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली. एकूण २३६ पैकी १५ जागा अनुसूचित जातीसाठी आहेत. दोन जागा अनुसूचित जमातीसाठी आहेत. ६३ जागा नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी लॉटरीच्या माध्यमातून आरक्षित करण्यात आल्या. एकूण २३६ पैकी ११८ जागा महिलांसाठी राखीव आहेत. शेवटच्या दिवशी आणखी सूचना-हरकती आयोगाकडे दाखल होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91086 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..