भूमफिया टोळीचा पर्दाफाश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भूमफिया टोळीचा पर्दाफाश
भूमफिया टोळीचा पर्दाफाश

भूमफिया टोळीचा पर्दाफाश

sakal_logo
By

घर देण्याच्या बहाण्याने
१४ लाखांना लुबाडले
मालाड, ता. १ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिमेतील चारकोप भाब्रेकर नगरमध्ये म्हाडाच्या जागेवर घर बनवून देण्याच्या नावाखाली १४ लाखांना लुबाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रिक्षाचालक अगतराव आवटे आणि सईदुनिसा अन्वर अली खान यांच्या तक्रारीवरून आरोपी कनिराज नाडर, दीपक भंडारी आणि अर्चना शिंदे यांच्याविरोधात चारकोप पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे.
भाब्रेकर नगरमध्ये म्हाडाच्या भूखंडावर नाडर वेल्फेअर सोसायटीचे फलक लावून तिथे सदनिका बांधून देण्याच्या बहाण्याने तक्रारदार सईदुनिसा खान व अगतराव आवटे यांच्याकडून प्रत्येकी सात लाख रुपयांचे धनादेश आरोपींनी घेतले. त्यांना २०१५ मध्ये बनावट कागदपत्रेही बनवून दिली होती. काही दिवसांनी ती कागदपत्रे परत घेत नवीन देण्यात आली; मात्र आजपर्यंत त्यांना घर दिले नाही. आवटे यांनी सातत्याने पाठपपुरावा केला असता आरोपी सुरुवातीला टाळाटाळ करत राहिले. नंतर त्यांनी धमकवण्यास सुरुवात केली. आवटे यांनी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चारकोप पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर त्यांनी सतत वरिष्ठ पोलिसांशी पत्रव्यवहार करत पाठपुरावा केल्यानंतर आरोपींविरोधात विविध कलमांतर्गत ३१ जुलै रोजी गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिस निरीक्षक जगदीश भोपळे पुढील तपास करत आहेत.
आरोपींनी भाब्रेकर नगरमध्ये जवळपास ७० झोपड्या म्हाडाच्या जागेवर बांधल्या आहेत. घर देतो असे सांगून अनेकांची लाखोंची फसवणूक केल्याचे सांगण्यात आले.
आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत. लवकरच आरोपींना अटक करू, असे चारकोप पोलिस ठाण्याचे निरीक्षक जगदीश भोपळे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91095 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..