विषारी नागाला जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विषारी नागाला जीवदान
विषारी नागाला जीवदान

विषारी नागाला जीवदान

sakal_logo
By

कासा, ता. १ (बातमीदार) : कासा येथील एका घरात शिरलेल्या नागाला सर्पमित्राने पकडून सुखरूप जंगलात सोडून जीवदान दिले. कासा येथील कातकरी वस्तीतील वडपाडा येथील एका घरात दुपारच्या सुमारास एक भला मोठा विषारी नाग शिरला होता. त्यामुळे घरातील कुटुंबासह सर्व पाड्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते; मात्र स्थानिकांनी सर्पमित्र जितेंद्र पाटील यांच्याशी संपर्क करून माहिती दिल्यानंतर सर्पमित्र तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सात फुटी विषारी नागाला अथक प्रयत्न करून पकडून गोणीत भरले. त्याने दोन उंदरांना गिळले असल्याने तो थोडा सुस्तावला होता. त्यानंतर त्या सापाला महालक्ष्मी येथील जंगलात सोडून दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91115 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top