विक्रमगड येथे चित्रकला स्पर्धा; ३०० विद्यार्थ्यांचा सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगड येथे चित्रकला स्पर्धा; ३०० विद्यार्थ्यांचा सहभाग
विक्रमगड येथे चित्रकला स्पर्धा; ३०० विद्यार्थ्यांचा सहभाग

विक्रमगड येथे चित्रकला स्पर्धा; ३०० विद्यार्थ्यांचा सहभाग

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २ (बातमीदार) : अश्मी फाऊंडेशन व क्रिएशन ग्रुप गोरेगाव व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विक्रमगड यांच्या माध्यमातून अंगणवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक च्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे बक्षिसे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेसाठी अश्मी फाऊंडेशन व क्रिएशन ग्रुप गोरेगावचे अनिल कुबल, शोभा गुल्हाने, उल्का खानोलकर, प्रफुल्ल पावस्कर, प्रतिभा पाटील, सौदामिनी केळकर, संगीता सप्रे, शुभांगी कुणाल किनीकर, रेवती कोचरे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, समाजसेवक कमलाकर पाटील, नीलिमा पाटील, ग्राम मंगल अनुताई शिक्षण केंद्रचे मुख्याध्यापक नरेश चौधरी, विजय बिराडे, जितेंद्र जुलालसिंग पाटील, ग्राममंगलचे सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सर्व कार्यकर्ते यांनी विशेष सहकार्य केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91147 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..