वाढत्या महागाईने व्यावसायिक हवालदिल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाढत्या महागाईने व्यावसायिक हवालदिल
वाढत्या महागाईने व्यावसायिक हवालदिल

वाढत्या महागाईने व्यावसायिक हवालदिल

sakal_logo
By

वाशी, ता. २ (बातमीदार) ः चहा देणाऱ्या व्यावसायिकांपासून रेस्टॉरंटचालकाच्या खाद्यपदार्थ विक्री साखळीतील प्रत्येक घटक वाढत्या महागाईमुळे विलक्षण त्रस्त आहे. भाज्या, डाळी, पनीर, चिकन, खाद्यतेल, गॅस सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढतच असल्याने व्यवसायातील नफ्याचे गणितच चुकत असल्याने दर वाढविणे, व्यवसायाच्या वेळा कमी करणे तसेच कामगार कपात करण्याची वेळ विक्रेत्यांवर आली आहे.
शहरात सुमारे पाचशेच्या सुमारास चहाची दुकाने आहेत. सध्या चहाची पावडर ३२० रुपये प्रतिकिलोवरून ३९० रुपये झाली आहे. एक लिटर दूध ६४ रुपयांवर गेले आहे. साखरही ३७-३८ रुपये किलोने खरेदी करावी लागते; तर व्यावसायिक सिलिंडरदेखील २,४०० घरात गेला आहे. अशातच वाढत्या महागाईच्या काळात कामगारांचा पगारही वाढवावा लागत असल्याने चहाविक्रेत्यांनी चहाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. अशीच काहीशी परिस्थिती रेस्टारंटचालकांची आहे. भाज्यांचे दर वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढले आहेत. तसेच पनीर, दूध, चीज आदी डेअरी उत्पादनांच्या किमतीत तीस ते पस्तीस टक्क्यांची वाढ झाल्याने एकूण उत्पन्नाच्या चाळीस टक्के रक्कम खाद्यपदार्थांच्या तयारीसाठी लागत आहे. परिणामी, नफ्यावर मोठा परिणाम झाला असल्याने खाद्यपदार्थांचे दर वाढविण्याची वेळ आल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

किराणा दुकानांकडे ग्राहकांची पाठ
गेल्या दशकभरात उपनगरांमध्ये किराणा साहित्य देणाऱ्या मॉलची संख्या वाढली आहे. महागाईमुळे किराणा दुकानांचा ग्राहक मॉलमध्ये खरेदीसाठी जातात. महागाईमुळे किराणा दुकानांमध्ये किरकोळ दरात जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे ग्राहकांना परवडत नाही. पूर्वी मोठ्या प्रमाणात खरेदी करणारा ग्राहक आता हात आखडता घेताना दिसत आहे. अशातच डिझेलच्या किमती गगनाला भिडल्याने माल वाहतुकीचा खर्चदेखील वाढला आहे.
----------------------------------------
महागाईचा फटका कमी करण्यासाठी अनेक मेन्यू कार्डचा आकार कमी केला आहे. कमी खपाचे पदार्थ काढून टाकले आहेत, तर काही उपाहारगृहाच्या चालकांनी वेळाही कमी केल्या आहेत.
- राजेश मोकाशी, उपाहारगृहमालक, ऐरोली
---------------------------------------
व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर २,४०० च्या घरात गेला आहे. त्यात कामगारांचा पगार, चहासाठी लागणारे साहित्यदेखील २० ते २५ टक्क्यांनी महाग झाले आहे. त्यामुळे चहाचे दर दोन रुपयांनी वाढविले आहेत.
- रमेश सूर्यवंशी, चहाविक्रेते

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91154 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top