साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ग्रंथालय सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ग्रंथालय सुरू
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ग्रंथालय सुरू

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ग्रंथालय सुरू

sakal_logo
By

मालाड, ता. २ (बातमीदार) ः गोरेगाव पश्चिम येथील भगतसिंग नगर नंबर दोन या वस्तीमध्ये भाकर फाऊंडेशनमार्फत कम्युनिटी डेव्हलपमेंट सेंटर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ग्रंथालय, बिनधास्त बोल समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे.
यातील कम्युनिटी डेव्हलपमेंट सेंटरचे उद्‌घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शिक्षिका माधुरी चिटणीस यांच्या हस्ते, बिनधास्त बोल समुपदेशन केंद्राचे उद्‌घाटन शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ग्रंथालयाचे उद्‌घाटन प्रा. डॉ. वैजयंता आनंद यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दोन वर्षे सातत्याने भाकर फाऊंडेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांना कार्यानुभव प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी भाकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक सोनावणे, समाजवादी नेते अरविंद सावला, सुमित जगताप, चाऊस शेख, नामदेव येडगे यांच्‍यासह विविध सामाजिक व राजकीय नेते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91161 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top