
सीमेवर लढलेल्या समरसेनानींचा सन्मान
धारावी, ता. २ (बातमीदार) : ‘शौर्या तुला वंदितो’ म्हणजेच देशाच्या सीमेवर लढलेल्या समरसेनानींचा सन्मान सोहळा ३१ जुलै रोजी लोअर परळ येथील सीताराम मिल्क कंपाऊंड या महापालिकेच्या शाळेत पार पडला. या वेळी औक्षण करून तसेच दुर्गसेविकांच्या हस्ते राखी बांधून सर्व कारगिल हिरोंचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, मुंबई विभाग यांनी केले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नायक दीपचंद यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सोबत कारगिल युद्धात लढलेल्या काही इतर समरसेनानींचा ही शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्यात प्रामुख्याने १६ समरसेनानीं तसेच वीरपत्नींचा समावेश होता. कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मुंबई विभागासोबतच पेण, पनवेल, ठाणे, तळा-माणगाव, महाड, बदलापूर, अंबरनाथ तसेच कोल्हापूर इत्यादी विभागांचा सहभागही होता. कार्यक्रमाचा समारोप मुंबई पोलिस दलातील कार्यरत सहायक पोलिस निरीक्षक शाहीर प्रवीण फणसे, बालशाहीर वीर व शर्वरी फणसे यांच्या गीतांनी झाला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91168 Txt Mumbai Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..