उरणच्या जलतरणपट्टूंची पनवेलमध्ये छाप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उरणच्या जलतरणपट्टूंची पनवेलमध्ये छाप
उरणच्या जलतरणपट्टूंची पनवेलमध्ये छाप

उरणच्या जलतरणपट्टूंची पनवेलमध्ये छाप

sakal_logo
By

उरण, ता. २ (वार्ताहर) ः पनवेलच्या कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीतील जलतरण स्पर्धेत नवी मुंबई तसेच जिल्हाभरातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात उरणच्या स्पर्धकांनी आपली छाप उमटविताना पदकांची लयलूट केली आहे.
कर्नाळा स्पोर्ट्स असोसिएशन आणि ॲक्वा स्पोर्ट्स असोसिएशन, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी जिल्हास्तराची जलतरण स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यासह नवी मुंबईतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आठ वर्षे ते चाळीस वर्षांवरील गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत उरणच्या आर्यन मोडखरकर याने फ्रीस्टाई ५० मी, बॅक्स्ट्रोक ५० मी आणि बटरफ्लाय ५० मी, अशा तीनही प्रकारत सुवर्णपदकाची कमाई केली; तर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या जयदीप सिंग, आर्य पाटील, रुद्राक्षी टेमकर, ओंमकार कोळी, मोहित म्हात्रे, वेदांत पाटील, वृतिका म्हात्रे, अनिता म्हात्रे आणि हितेश भोईर यांनी पदकांची कमाई केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91204 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..