बेकायदा सेल्फी पॉईंट हटवण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदा सेल्फी पॉईंट हटवण्याची मागणी
बेकायदा सेल्फी पॉईंट हटवण्याची मागणी

बेकायदा सेल्फी पॉईंट हटवण्याची मागणी

sakal_logo
By

वाशी चौपाटीच्या सेल्फी पॉईंटवरून वाद
नेरूळ, ता. २ (बातमीदार) ः वाशी सेक्टर १० मधील मिनी सीशोरचे नामकरण जुहू चौपाटी करावे, असा ठराव २०१५ मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला आहे. मात्र, आजतागायत या प्रस्तावाला मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे जुहूगाव ग्रामस्थांनी चौपाटीवरील वाशी मिनी सीशोर या सेल्फी फलकाचे नाव बदलण्याची मागणी हिमांशू पाटील यांनी केले आहे.
महापालिकेकडून जुहू चौपाटीचे नाव बदलण्याच्या मागणीकडे वारंवार दुर्लक्षित केले जात आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांकडून वारंवार पाठपुरावा केला जात आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने गेल्या अडीच वर्षात अनेक वेळा बैठका पत्र आणि वारंवार तक्रारी केल्या आहेत. २०२१ मध्ये केलेल्या तक्रारीला उत्तर देताना महापालिका अधिकाऱ्यांनी वाशी मिनी सीशोर हटविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे; परंतु, फलक जैसे थे असल्याने अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91209 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..