रताळ्याचे थालीपीठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रताळ्याचे थालीपीठ
रताळ्याचे थालीपीठ

रताळ्याचे थालीपीठ

sakal_logo
By

पल्लवी आचार्य

उपवास स्पेशल
रताळ्याचे थालीपीठ

साहित्य
२ उकडलेली मोठी रताळी
१ वाटी राजगिरा किंवा शिंगाडा पीठ
२ चमचे वाटलेली हिरवी मिरची
२ चमचे दही
१/४ वाटी दाण्याचे कूट
मीठ चवीनुसार
आवश्यकतेनुसार तूप किंवा तेल

कृती
उकडलेली रताळी ताटात घेऊन चांगली कुस्करून एकजीव करून घ्यावीत. त्यात राजगिरा किंवा शिंगाडा पीठ, वाटलेली हिरवी मिरची, दही, दाण्याचे कूट आणि मीठ घालून छान मळून घ्यावे. मिश्रणाचा एकसंध गोळा होईपर्यंत मळावे. मळलेल्या मिश्रणाचे लिंबापेक्षा किंचित मोठे गोळे करावे आणि पोळपाटावर प्लास्टिक टाकून त्यावर थोडे तूप/तेल लावून थालीपीठ थापावे. गरम तव्यावर तूप/तेल टाकून थालीपीठ खरपूस भाजून घ्यावे. गरम गरम थालीपीठ शेंगदाण्याच्या चटणीसोबत खायला द्यावे.

शेंगदाणा चटणी : २-३ चमचे शेंगदाणा कूट, ३ मोठे चमचे दही, चवीनुसार सैंधव/साधे मीठ व किंचित साखर हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे. एका पातेल्यात अर्धा चमचा तूप किंवा तेल टाकून मंद आचेवर ठेवावे. त्यात फोडणीसाठी १ चमचा जिरे टाकावेत. जिरे तडतडल्यावर दोन मिरच्यांचे तुकडे टाकून तयार केलेले मिश्रणात पातेल्यात टाकावेत आणि चांगले एकजीव करावे.

टीप : कुकरमध्ये ४ शिट्यात रताळी छान मऊसर शिजतात.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91222 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..