
महानगरपालिकेला नायगाव-बापाणे प्रवेशव्दाराचा विसर
महापालिकेला नायगाव-बापाणे प्रवेशद्वाराचा विसर
विरार, ता. २ (बातमीदार) : वसई विरार शहर महापालिकेमार्फत शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यांवर प्रवेशद्वार (कमानी) बांधण्याच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी देण्यात आली. यामध्ये विरार, नालासोपारा, वसई व नायगाव या शहरात प्रवेश करणाऱ्या प्रवेशद्वारांमध्ये अनुक्रमे विरार, पेल्हार, वालीव व सातिवली या मार्गांची निवड करण्यात आलेली आहे. यासाठी पाच कोटींचा खर्च अपेक्षित आहे. असे असताना महानगरपालिकेला महत्त्वाच्या अशा बापाणे-नायगाव मुख्य रस्त्यावरील बापाणे (राष्ट्रीय महामार्ग ४८) प्रवेशद्वाराचा विसर पडल्याकडे माजी सभापती कन्हैया भोईर यांनी महानगरपालिकेचे लक्ष वेधलेले आहे.
सर्वांत वेगाने विकसित होणारा व झपाट्याने लोकसंख्या वाढणारा विभाग म्हणून नायगावची ओळख आहे. वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा नायगाव पूर्व-पश्चिम उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. यामुळे थेट विरारपासून नायगावपर्यंतचा भाग राष्ट्रीय महामार्गाला जोडला गेला आहे. यामुळे नायगावमधून थेट वसई-नालासोपारा-विरारपर्यंत अत्यंत कमी वेळात पोहोचणे शक्य झाले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या बापाणे येथे महानगरपालिकेचे प्रवेशद्वार असणे गरजेचे आहे, असे माजी सभापती कन्हैया भोईर यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91235 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..