
घोणसे घाटात टँकर कलंडला
म्हसळा, ता. २ (बातमीदार) ः पुणे ते दिघी पोर्ट राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव -दिघीदरम्यान घोणसे घाटातील केळेवाडी येथील तीव्र वळणावर भरधाव वेगाने आलेल्या टँकर कलंडला. अपघाताची नोंद म्हसळा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
जेएसडब्लू वडखळ येथून निघालेला टँकर देवघर, म्हसळा येथील प्रकल्पात जात होता. घोणसे घाटात केळेवाडी येथील शेवटच्या तीव्र वळणावर भरधाव आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले तो पलटी झाला. अपघाताचे माहिती मिळताच सहायक निरीक्षक उद्धव सुर्वे, देवघरचे तलाठी सुनील भगत, अमोल शिगवण, देवघर आणि घोणसे ग्रामपंचायतीचे कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली.
म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटात वारंवार अपघात होत असल्याने मध्यंतरी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता आणि पर्यायी मार्गावरून वाहतूक कळविण्यात आली होती. घाटातील तीव्र उताराचा अंदाज न आल्यास अथवा वाहनचालक नवखा असल्यास हमखास अपघात होत असल्याचे परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पुणे ते दिघी पोर्ट ७५३ एफ या राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव ते दिघी रस्त्याचा ५४ किमीचा बहुतांश मार्ग हा सदोष आहे. याचा शास्त्रोक्त अभ्यास होण्यासाठी मार्गावरील प्रत्येक अपघाताची नोंद संबंधित मार्गावरील माणगाव, म्हसळा, दिघी सागरी पोलिस ठाण्यात होते आवश्यक आहे. त्यानंतर योग्य उपाययोजना करता येतील.
- महादेव पाटील, माजी सभापती, पंचायत समिती, म्हसळा
घोणसे घाटातील केळेवाडी येथील शेवटचे तीव्र वळण धोकादायक आणि अपघातप्रवण क्षेत्र आहे. वळणावर काही ठिकाणी संरक्षक भिंत बांधली आहे. मंगळवारी झालेला अपघात हा संरक्षण भिंत संपते त्या ठिकाणी झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने घाटात २० मीटर क्षेत्रांत संरक्षक भिंत बांधणे आवश्यक आहे.
- अनिल महामुणकर, ग्रामस्थ, देवघर-घोणसे
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91236 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..