पत्नीला पट्टयाने मारहाण करणारा अग्निशमन दलाचा फायरमन पोलिसांच्या ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्नीला पट्टयाने मारहाण करणारा अग्निशमन दलाचा फायरमन पोलिसांच्या ताब्यात
पत्नीला पट्टयाने मारहाण करणारा अग्निशमन दलाचा फायरमन पोलिसांच्या ताब्यात

पत्नीला पट्टयाने मारहाण करणारा अग्निशमन दलाचा फायरमन पोलिसांच्या ताब्यात

sakal_logo
By

पत्नीला मारहाण करणाऱ्या फायरमनला बेड्या
बेलापूर येथील घटना; एनआरआय पोलिसांची कारवाई
नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला पट्ट्याने बेदम मारहाण करणाऱ्या नवी मंबई महापालिकेच्या अग्निशमन दलात कार्यरत असलेल्या एका फायरमनला एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे. बेलापूर येथे शनिवारी पहाटे ही घटना घडली होती.
२१ वर्षीय पीडित विवाहितेचा दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या अग्निशमन दलात कार्यरत असलेल्या २७ वर्षीय फायरमनशी विवाह झाला होता; मात्र लग्नाच्या काही महिन्यांनंतरच या दोघांमध्ये कुरबुरीला सुरुवात झाली होती. ३० जुलै रोजी मध्यरात्री १ च्या सुमारात पीडित महिला बॉसशी मोबाईल फोनवरून बोलत होती. याच वेळी तिचा पती घरी आल्यानंतर त्याने पत्नीकडे याबाबत विचारणा केली. या वेळी बॉसशी बोलत असल्याचे सांगितल्यानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला कमरेच्या पट्ट्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत पत्नीला दुखापत झाल्यानंतर तिने घरातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला; मात्र फायरमनने तिला शिवीगाळ करत गणवेशाच्या बेल्टने पुन्हा बेदम मारहाण केली. अखेर या भांडणाच्या आवाजाने जमलेल्या शेजाऱ्यांनी पीडितेची पतीच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर महिलेने १०० क्रमांकावर संपर्क साधत एनआरआय पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर जवानाला अटक करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91245 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top