नाल्यात बुडून अल्पवयीनाचा मृत्यू. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाल्यात बुडून अल्पवयीनाचा मृत्यू.
नाल्यात बुडून अल्पवयीनाचा मृत्यू.

नाल्यात बुडून अल्पवयीनाचा मृत्यू.

sakal_logo
By

नाल्यात बुडून अल्पवयीन मुलाचा मृत्यू
मानखुर्द, ता. २ (बातमीदार) ः मानखुर्दच्या मंडाला झोपडपट्टीतील नाल्यात बुडून सोमवारी (ता. १) एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. हुसेन शेख (वय १५) असे त्याचे नाव असून तो भंगार वेचण्यासाठी नाल्यातून पलीकडे जात असताना दुर्घटना झाली.
सोमवारी दुपारी १.३० च्या सुमारास हुसेन मित्रांसोबत भंगार वेचण्यासाठी निघाला होता. त्या वेळी थर्माकोलवर बसून तिघे नाला ओलांडत होते. थर्माकोल उलटल्याने हुसेन नाल्यात पडला. त्याला पोहता येत नसल्यामुळे तो बुडाला. त्याविषयी स्थानिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती दिली. मानखुर्द निर्भया पथक, बीट मार्शल, अग्निशमन दल आणि पालिकेच्या पथका स्थानिकांच्या मदतीने हुसेनचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर सायंकाळी ६.३०च्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला. मानखुर्द पोलिसांनी तो उत्तरीय तपासणीसाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
नाल्यांनी घेतले मुलांचे बळी
गेल्या काही वर्षांमध्ये नाल्यामध्ये बुडून अनेक मुलांना जीव गमवावा लागला आहे. २०१७ मध्ये जमीर शेख (९) याचा नाल्यात बुडून मृत्यू झाला होता. २०१८ मध्ये म्हाडा वसाहत आणि मोहिते-पाटील नगरमधील नाल्यामध्ये शिवा भोसले (५) बुडाला होता. अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91246 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..