ओबीसी हक्क संघर्ष समितीचे निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओबीसी हक्क संघर्ष समितीचे निवेदन
ओबीसी हक्क संघर्ष समितीचे निवेदन

ओबीसी हक्क संघर्ष समितीचे निवेदन

sakal_logo
By

पालघर, ता. २ (बातमीदार) ः ओबीसी हक्क संघर्ष समितीच्या वतीने पालघरचे नवनियुक्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांची भेट घेण्यात आली. पालघर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये ओबीसींसाठी शून्य टक्के आरक्षण बांठिया आयोगाने सुचवले आहे. हा ओबीसींवर अन्याय असून याबाबत आमचे निवेदन शासनाकडे वस्तुनिष्ठ अभिप्रायासह पाठवावे, अशी विनंती या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली.
पालघर जिल्हामध्ये ५७ टक्के ओबीसी समूह आहे, पण बांठिया आयोगाने जिल्‍ह्यात ओबीसींसाठी आरक्षण दिले नाही. त्यामुळे ओबीसींवर अन्याय झाला आहे, अशी तक्रार संघर्ष समितीने केली. निवेदन देण्यासाठी ओबीसी हक्क संघर्ष समितीचे आर. डी. संखे, केतन पाटील, पी. टी. पाटील, कुंदन संखे, सुभाष मोरे, मिलिंद साखरे, सुधाकर संखे हे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91264 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top