
शे.का. पक्ष आजही ताकतीने उभा आहे ः धैर्यशील पाटील
पेण, ता. २ (वार्ताहर) : मागच्या अनेक काळापासून शे. का. पक्ष कष्टकरी, श्रमजीवी मजूर यांच्यासाठी लढत आला आहे. काही भांडवलदार आमच्या जमिनी घेऊ पाहत आहेत. त्यांना एकही इंच जागा मिळणार नाही, कारण रायगडपासून कोकणापर्यंत शे.का. पक्ष आजही ताकतीने उभा आहे, असे प्रतिपादन माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी वडखळ येथील सभेत केले.
या वेळी पुढे बोलताना धैर्यशील पाटील म्हणाले, की कोणी स्वतःला मदमस्त समजत असेल तर त्या प्रस्थापितांशी झुंज देण्याची ताकद आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. लोकांच्याच जीवावर २०१४ ला मी निवडून आलो हा इतिहास शेकापक्षाचा आहे असे त्यांनी सांगितले. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा ७५ वा अमृतमहोत्सव मेळावा पेण तालुक्यातील वडखळ येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी संपूर्ण वडखळ परिसर लाल बावटामय झाला होता. या मेळाव्याला दिल्लीचे आम आदमी पक्षाचे मंत्री गोपाल राय, माजी खासदार राजू शेट्टी, शेकाप चिटणीस तथा आमदार जयंत पाटील, आमदार बाळाराम पाटील, आमदार श्यामसुंदर शिंदे, माजी आमदार धैर्यशील पाटील, पंडित पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, जे. एम. म्हात्रे, पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शेकाप महिला आघाडीच्या आशा शिंदे, जि. प. सभापती नीलिमा पाटील आदींसह शेकापचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91271 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..