
मोखाड्यातील आयटीआयमध्ये नवीन व्यावसायिक तुकड्यांना मंजुरी
मोखाडा, ता. २ (बातमीदार) : मोखाडा आयटीआयमध्ये नवीन व्यावसायिक तुकड्या मिळाव्यात म्हणून मागील बऱ्याच वर्षांपासून मागणी करण्यात येत होती. अखेर दिल्लीतील डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग (डीजीईटी) यांनी नवीन चार तुकड्यांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक व्यावसायिक शिक्षण मिळणार असून ते कौशल्य शिक्षणाच्या प्रवाहात येणार आहे. या नवीन तुकड्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मोखाड्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग दिल्ली यांच्याकडे वीजतंत्रीसाठी २ तुकड्या, यांत्रिक मोटार गाडीच्या २, फिटरसाठी २ तुकड्या, वायरमन १, वेल्डर १ यांना संलग्नता द्यावी, याकरिता शिफारस करण्यात आली होती. सदर शिफारशीस मान्यता मिळाली असून त्याचे लेखी आदेश मोखाडा संस्थेला प्राप्त झाले आहेत. यामुळे सद्यस्थितीतील ८० विद्यार्थी इतकी असलेली प्रवेश क्षमता १६८ ने वाढली असून २४८ विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
फोटो....
मोखाड्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91280 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..