मंडळाची ऑनलाईन एक खिडकीला पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडळाची ऑनलाईन एक खिडकीला पसंती
मंडळाची ऑनलाईन एक खिडकीला पसंती

मंडळाची ऑनलाईन एक खिडकीला पसंती

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : गणेशोत्सवाच्या काळात उभारण्यात येणारे मंडप, ध्‍वनिक्षेपक यांच्यासह विविध परवानग्या घेणे बंधनकारक आहे. त्‍या घेण्यासाठी मंडळांची होणारी फरपट थांबावी यासाठी पालिकेने प्रभाग समितीनिहाय एक खिडकी योजना सुरू केली. त्यातच आतापर्यंत प्राप्त झालेल्या १८ अर्जापैकी १३ मंडळांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ठाण्यातील अनेक मंडळांनी ऑनलाईन एक खिडकी योजनेला पसंती दिली आहे.

ठाणे महापालिकेने ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज स्‍वीकारण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मागील काही दिवसांत महापालिकेकडे १८ अर्ज आले आहेत. ऑनलाईन पद्धतीमध्ये अर्ज ऑनलाईन भरावा लागतो, त्यानंतर त्याखाली कागदपत्रे जोडावी लागतात, त्यानंतर त्याची प्रिंट काढता येऊ शकते. कागदपत्रांची तपासणी हीदेखील ऑनलाईन पद्धतीने होत असते. तसेच याच ठिकाणी वाहतूक, स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेची स्थळ पाहणीची प्रक्रिया सुरू असताना या तिन्‍ही विभागांकडून ऑनलाईन कागदपत्रांची योग्य प्रकारे तपासणी करून त्यावर ना हरकत प्रमाणपत्र दिले जात आहे.

.....

कोट :-

ऑनलाईन पद्धतीत सुसूत्रता असल्याने आणि वेळेची बचत होत असल्याने गणेश मंडळे या पद्धतीला प्राधान्य देत आहेत. त्यानुसार पालिकेमार्फतदेखील संबंधित विभागाकडून ऑनलाईन व ऑफलाईन अर्जदेखील तात्काळ निकाली काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
- गजानन गोदापुरे, उपायुक्त, ठामपा.
......
प्रभाग समिती - प्राप्त अर्ज
नौपाडा- ३
वागळे- १
लोकमान्य सावरकरनगर- १
वर्तकनगर- १
माजिवडा मानपाडा- ४
उथळसर- ३
कळवा- २
मुंब्रा- ३
दिवा- १

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91290 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..