रायगड बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायगड बातम्या
रायगड बातम्या

रायगड बातम्या

sakal_logo
By

शिवश्री वाठोरे संभाजी ब्रिगेड संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी
माणगाव (वार्ताहर) : तालुक्यातील शिवश्री विक्रम वाठोरे यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेऊन संभाजी ब्रिगेड रायगड जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.
वाठोरे सहा वर्षांपासून शिवश्री भूषण सिसोदे, माजी रायगड जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या संघटनेत रायगड जिल्हा कार्याध्यक्ष पदावर क्रियाशील राहून अनेक आंदोलने व समाजोपयोगी कामे केली आहेत. त्याचप्रमाणे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती, शाक्त शिवराज्याभिषेक समिती, राजमाता जिजाऊ जन्मोत्सव रथयात्रा या सर्व समित्यांवर कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संभाजी ब्रिगेड ॲड. मनोज आखरे यांच्या अध्यक्षतेखाली वाठोरे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे.

नागोठणे रामनगर येथे एकाची आत्महत्या
नागोठणे (बातमीदार) : नागोठणे येथील रामनगर परिसरात राहणाऱ्या प्रकाश कृष्णा धोत्रे (४५) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नागोठणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश धोत्रे हा एकटाच राहत होता. तो कोणाशीही बोलत नव्हता. तो अविवाहित असून, त्याचे मानसिक संतुलन बिघडलेले होते. रविवारी (ता. ३१) सकाळी ११.१५ च्या सुमारास त्याने दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद दीपक धोत्रे (२१) याने नागोठणे पोलिस ठाण्यात केली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार एस. आर. म्हात्रे करत आहेत.

विजेच्या झटक्याने वायरमनचा मृत्यू
नागोठणे, ता. ३ (बातमीदार) : महावितरणच्या नागोठणे कार्यालयातील वायरमन धर्मराज भोसले (३२) याचा उच्च दाब वीजवाहिनीचा झटका लागल्याने गुरुवारी (ता. २८) मृत्यू झाला. या प्रकारानंतर महावितरणचे एकही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नागोठणे येथील आय.टी.आय महाविद्यालयाच्या मागे असलेला एबी स्विच बंद करण्यासाठी भोसले गेले होते. मात्र, त्याच वेळेस विजेचा प्रवाह लोखंडी खांबामध्ये उतरल्याने त्यांना जोरदार झटका बसला. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य शिरसाट यांनी सांगितले. भोसले हे मूळचे बीड जिल्ह्यातील मांजरसुभा गावचे रहिवासी आहेत. सध्या नागोठणे येथील शांतीनगर भागात वास्तव्यास होते. घरच्या कठीण परिस्थितीवर मात करत त्‍यांनी परिश्रम आणि चिकाटीने हा पल्ला गाठला होता. नुकतेच त्यांना कायमस्वरूपी करण्यात आले होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगी (६ महिने), आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर महावितरणझटका बसल्याने ते मृत पावले आहेत.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या वेळी महावितरणाचे एकही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे या निंदनीय प्रकाराचा नागोठणे वासियांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

..........…...............................
माझ्या आईची मुंबई येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया असल्याने मी कार्यालयीन रजेवर होतो. या प्रकरणाची माहिती मिळताच तत्काळ नागोठणे येथे रवाना झालो.
- योगेश गायकवाड, वरिष्ठ अधिकारी, महावितरण नागोठणे

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91320 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..