अंबरनाथच्या तबलावादकांची जागतिक स्पर्धेसाठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबरनाथच्या तबलावादकांची जागतिक स्पर्धेसाठी निवड
अंबरनाथच्या तबलावादकांची जागतिक स्पर्धेसाठी निवड

अंबरनाथच्या तबलावादकांची जागतिक स्पर्धेसाठी निवड

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. ३ (बातमीदार ) : दुबई येथे होणाऱ्या जागतिक तबलावादन स्पर्धेसाठी अंबरनाथमधील छोट्या तबला वादकांची निवड झाली आहे. नुकतीच पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय तबलावादन स्पर्धेमध्ये चिमुरड्यांनी आपल्‍या कलेची मोहोर उमटवली.
येथील श्री गुरुकृपा संगीतालयाचे विद्यार्थी आरुष आयरकर, सिद्धार्थ कांबळे, तनय गवई, गौरव करवंदे, श्रेयस भोईर, आळंदी अहिर, मेघा कामत यांनी तबला गुरू सुनील शेलार यांच्या मार्गदर्शनातून पुणे येथील अखिल भारतीय सांस्कृतिक मंडळ, पुणे (युनेस्कोच्या सहकार्याने) आयोजित तबला वादन स्पर्धेत आपापल्या वयोगटात प्रथम, द्वितीय क्रमांक पटकावला आहे. आता पुढील जागतिक स्पर्धेसाठी विजयी तबला वादक दुबई येथे १५ ऑगस्ट रोजी तबला वादन करणार आहेत. स्पर्धेत विद्यार्थी उल्लेखनीय कामगिरी करून विजयी होतील, अशी आशा तबला शिक्षक सुनील शेलार यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91340 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..