सत्तेतील सारीपाटात मागासवर्गीयांचा बळी देऊ नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सत्तेतील सारीपाटात मागासवर्गीयांचा बळी देऊ नका
सत्तेतील सारीपाटात मागासवर्गीयांचा बळी देऊ नका

सत्तेतील सारीपाटात मागासवर्गीयांचा बळी देऊ नका

sakal_logo
By

धारावी, ता. ३ (बातमीदार) : राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारने महाविकास आघाडीने घेतलेले सर्व निर्णय रद्द केले आहेत. त्यात सामाजिक न्याय विभागाने मागासवर्गीय जनतेसाठी घेतलेल्या निर्णयांचादेखील समावेश आहे. याबद्दल शिवसेनेचे धारावीचे माजी आमदार व राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष बाबुराव माने यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सत्तेच्या सारीपाटात अगोदरच उपेक्षित असलेल्या मागासवर्गीयांचा बळी देऊ नका, रद्द केलेले निर्णय त्वरित मागे घ्या, असे आवाहन माने यांनी केले आहे.
अनुसूचित जाती-जमातीचे पदोन्नतीतील आरक्षण, शिष्यवृत्ती, परदेश शिष्यवृत्ती, भीमा कोरेगाव विजय स्तंभाचा विकास या प्रकरणातील हजारो कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हे मागे घेणे, इंदू मिल स्मारकाचा विकास, यासह अनेक विषयांवर महाविकास आघाडीमार्फत कार्यवाही सुरू होती. सत्तांतरापूर्वी सामाजिक न्याय विभागाने काही निर्णय घेतले होते. नवे सरकार सामाजिक न्याय विभागाच्या निर्णयांना हात लावणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र सरकारने या विभागाचे निर्णयदेखील रद्द केल्यामुळे राज्यातील मागासवर्गीयांमध्ये तीव्र नाराजीची भावना असल्याचे माने यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91362 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top