निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम धोक्यात. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम धोक्यात.
निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम धोक्यात.

निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम धोक्यात.

sakal_logo
By

मोखाडा, ता. ३ (बातमीदार) : कधी मुसळधार पाऊस, तर काही दिवस रखरखीत ऊन, अशा या निसर्गाच्या लहरीपणामुळे मोखाड्यात खरीप हंगामाचे पीक धोक्यात आले आहे. मुसळधार पावसाने लावणी केलेले भातपीक अनेक ठिकाणी वाहून गेले; तर आता आठवडाभरापासून रखरखीत उन्हामुळे नागली आणि वरईचे पीक करपण्याची भीती निर्माण झाली आहे; तर प्रशासनाने खरीप हंगामात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश अजूनही दिले नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मोखाडा तालुक्यात हा आदिवासीबहुल असून शेती हेच प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. त्यात खरीप हंगाम हा पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. तालुक्यात खरिपाचे १२ हजार ९५३ हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये भात २,०६५ हेक्टर, नागली ३,८१७ हेक्टर, वरई ३,८०० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. या वर्षी जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला, त्यामुळे तालुक्यातील अनेक भागात लावणी केलेले भातपीक वाहून गेले. आता आठवडाभरापासून रखरखीत ऊन पडत आहे. त्यामुळे लावणी केलेली नागली आणि वरईचे पीक करपण्याची भीती निर्माण झाली आहे.
पावसाच्या या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. काही शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी कृषी विभागाकडे केली आहे; तर पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी मोखाडा पंचायत समितीचे सदस्य प्रदीप वाघ यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
....
तालुक्यातून काही शेतकऱ्यांनी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची लेखी मागणी आमच्या कार्यालयाकडे केली आहे. मात्र, तहसीलदारांकडून पंचनामे करण्याचे कुठलेही आदेश आम्हाला आलेले नाहीत. त्यामुळे पंचनामे सुरू करण्यात आलेले नाहीत.
- सुनील पारधी, प्रभारी तालुका कृषी अधिकारी

फोटो....
रखरखीत उन्हामुळे मोखाड्यात नागली आणि वरईचे पीक जळून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91374 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top