रायगडमध्ये १३ स्मारकांवर तिरंगा फडकणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायगडमध्ये १३ स्मारकांवर तिरंगा फडकणार
रायगडमध्ये १३ स्मारकांवर तिरंगा फडकणार

रायगडमध्ये १३ स्मारकांवर तिरंगा फडकणार

sakal_logo
By

नागोठणे, ता.३ (बातमीदार) : भारताच्या अमृत महोत्‍सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र सरकारकडून ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये १३ स्‍मारके व पुतळ्‍‌यांच्या ठिकाणी तिरंगा फडकवला जाणार आहे. यामध्ये रायगड किल्ला, चवदार तळे,
चिरनेर इत्यादी स्मारकांचा समावेश आहे. त्‍यानिमित्ताने परिसराची स्वच्छता, साफसफाई करण्यात येणार असल्‍याने सर्व पुतळे आणि स्मारकांना नवी झळाळी प्राप्त होणार आहे.
ग्रामीण भागासह नगरपालिका, महापालिका, ग्रामपंचायत, तहसील कार्यालयांत ध्वज विक्री केंद्र उभारण्यात आली असून ध्वजाची उपलब्धता स्थानिक पातळीवर बचत गटाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यातील सर्व घरांवर तिरंगा फडकवला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील ५,२३,८६ घरे, नगरपालिका व नगरपंचायत १,८,८९२ घरे, पनवेल महापालिका २,४०,००० घरे असे ऐकून ८,७१,९०८ घरांचा समावेश आहे. यासाठी नागरिकांनी तिरंगा संहितेचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
रायगड ही क्रांतिकारकांची भूमी असून त्यांच्या क्रांतीची साक्ष देणारी अनेक स्मारके या ठिकाणी आहेत. अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत सर्व स्मारकांवर राष्‍ट्रध्वज तिरंगा फडकवण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाने स्मारकाची साफसफाई, रंगरंगोटी सुरू केल्‍याने त्यांना गतवैभव पुन्हा प्राप्त होत आहे.

रायगड जिल्ह्यातील प्रमुख स्मारकांमध्ये रायगड किल्ला, महाडचे चवदार तळे, पनवेलमधील शिरढोण येथील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा वाडा, कर्जतमधील हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील मानिवली, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे-उमरठ तालुका पोलादपूर, अलिबागमधील सरखेल कान्होजी आंग्रे स्‍मारक, चिरनेरचे हुतात्मा स्मारक, जंगल सत्याग्रह, पेणमधील गोगोदे येथील आचार्य विनोबा भावे यांचे गाव, समरभूमी उंबर खिंड, चावणी- खालापूर ही स्मारके व पुतळ्‍‌यांच्या परिसरात तिरंगा फडकवण्यात येणार आहे.

भारताचा अमृत महोत्‍सवी स्वातंत्र्य दिन देशभरात धुमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून यानिमित्त ‘हर घर तिरंगा’हे अभियान राबविण्यात येत असून रायगड जिल्ह्यातील १३ पुतळे व स्मारकांवर तिरंगा फडकवणार आहोत. याठिकाणी पूर्वतयारी सुरू केली आहे.
- डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्‍हाधिकारी, रायगड


फोटो
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’ या अभियानांतर्गत दिवेआगर समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91387 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top