यंदा पापलेटची चव महगणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा पापलेटची चव महगणार
यंदा पापलेटची चव महगणार

यंदा पापलेटची चव महगणार

sakal_logo
By

वसई, ता. ३ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातून सारंगा म्हणजेच पापलेटची विविध देशात निर्यात केले जाते. पावसाळ्यात मासेमारीवरील बंदी मागे घेतल्यानंतर सोमवारपासून मासेमारी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे पालघरमधील प्रसिद्ध पापलेट निर्यातीसाठी एकच लगबग सुरू झाली आहे. यासाठी फिशरमेन्स फेडरेशनने दर निश्चित केले असून पूर्वीपेक्षा यात १७० रुपयांनी वाढ झाली आहे. तर इंधन, बर्फासह वाढलेली मजुरी यामुळे दरात वाढ झाल्याचे मच्छीमारांनी सांगितले.
एकीकडे कोरोना संकट, नैसर्गिक आपत्तीला मच्छीमार बांधवाना तोंड द्यावे लागते. अशातच मासेमारी सुरु झाल्यानंतर जिल्ह्यात पापलेट मासा निर्यातीची लगबग सुरु झाली आहे. पालघर, डहाणू, वसई, नायगाव, अर्नाळा, सातपाटीसह गुजरातच्या सीमेपर्यंत मस्त्यबीज संपदा मोठ्या प्रमाणात आहे. पालघर व भाईंदरमध्ये सुमारे २ हजार बोटी आहेत त्यापैकी तीस टक्के बोटी समुद्रात गेल्या असून काही बोटी या नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीसाठी रवाना होणार आहेत. येथे पापलेट, हलवा, दाढा, घोळ, सुरमई असे मासे मोठ्या प्रमाणात आढळतात. पण नैसर्गिक आपत्ती, डिझेल, बर्फ, मजुरीत झालेली वाढ याचा फटका माशांच्या दरावर झाला आहे.
पालघरमधील दालदा फिशिंग पापलेट चवीला उत्तम असते. त्यामुळे खवय्यांमधून त्याची मागणी अधिक असते. युरोप, चीन, हाँगकाँगसह अन्य देशात पालघर जिल्ह्यातील पापलेट निर्यात केली जाते. मासेमारी सुरू झाल्याने पापलेट निर्यातीची लगबग सुरू झाली आहे. या गोदर निर्यातीचा दर हा पालघर ठाणे मुंबई फिशरमेन्स फेडरेशनकडून निश्चित करण्यात आला. या दरानुसारच खरेदी विक्री करावी लागणार आहे.

---------------------------------------
मागील वर्षी कोरोना काळात निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय अडचणी असल्याने परदेशात पापलेटच्या दरात फार तोटा सहन करावा लागला. त्यामुळे यंदा दर निश्चित करतांना डिझेलमधील वाढ, डॉलरचा वाढलेला दर, जीएसटी या बाबी लक्षात घेत त्यानुसार निर्यात दर लागू करण्यात आला आहे. हाच दर ठाणे, मुंबईला देखील लागू असणार आहे.
- बर्नड डिमेलो अध्यक्ष, पालघर ठाणे मुंबई फिशरमेन्स फेडरेशन
----------------------------------
असे आहेत दर
आताचे व पूर्वीचे निर्यात दर -
५०० ग्रॅमवरील - १३५० - ११८०
४०० ग्रॅमवरील - ११०० - ९३०
३०० ग्रॅमवरील - ९५० - ७८०
२०० ग्रॅमवरील - ७०० - ५३०
१०० ग्रॅमवरील - ५०० - ३३०

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91391 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..