
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
नवीन पनवेल, ता. ३ (वार्ताहर) : पनवेल शहरातील श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पनवेल महापालिका क्षेत्रातील १० शाळांतील ७०० गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष खेमचंद गोपलाणी यांनी दिली. पनवेल येथील श्री साईबाबा मंदिर येथे रविवारी (ता. ७) दुपारी २ वाजता साहित्याचे वाटप होणार आहे. यामध्ये पनवेल शहर, कोळेश्वर विद्या मंदिर, मोठा खांदा, धाकटा खांदा, तक्का, पोदी, गुजराती, उर्दू शाळांचा समावेश आहे. या कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमल, आयुक्त गणेश देशमुख उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी १० शाळांतील सुमारे १०० शिक्षकांचाही सन्मान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांसाठी शिर्डी यात्रेचेही आयोजन ट्रस्टतर्फे करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे सचिव रामलाल चौधरी, उपाध्यक्ष राम थदानी यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91394 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..