कासा येथे अवैद्य खैर चोरी पकडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासा येथे अवैद्य खैर चोरी पकडली
कासा येथे अवैद्य खैर चोरी पकडली

कासा येथे अवैद्य खैर चोरी पकडली

sakal_logo
By

कासा, ता. ३ (बातमीदार) ः खैराची चोरी करणाऱ्या तीन आरोपींना पकडण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. त्यांच्याकडून ८५ हजार ६७६ रुपये किमतीचा ७ हजार ४८८ घ.मी. माल तसेच, चार लाख रुपये किमतीचे वाहन (क्रमांक एमएच ०४ डीडी १६५७७) जप्त करण्यात आले आहे. रामविनय राम लक्ष्मण वर्मा, अब्बास हाफिज खान आणि मुकेश मोहन नायका अशी आरोपीची नावे आहेत. उप वनसंरक्षक एस. मधुमिता व सहायक वन संरक्षक जे. जे. कोऱ्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी एस. के. ऐनवाड, एस. डी. लोहरकरे, आर. एस. सारणीकर, एन. ए. कांबळे यांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास परिमंडळ वन अधिकारी एन. ए. कांबळे करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91412 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..