वसई, विरारमध्ये पाणीबाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई, विरारमध्ये पाणीबाणी
वसई, विरारमध्ये पाणीबाणी

वसई, विरारमध्ये पाणीबाणी

sakal_logo
By

वसई, ता. ३ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेकडून परिसरात पाणी वितरित करण्यासाठी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. केवळ शनिवार, रविवार पाणीपुरवठा खंडित होणार नाही. शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर होत असल्याने प्रशासकीय कामकाजावर टीका करण्यात येत आहे.

वसई-विरार महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पेल्हार, पापडखिंड, उसगाव, सूर्या टप्पा १ व २ या योजनेत एकूण २३१ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे; मात्र दोन्ही शहरांची लोकसंख्या २५ लाख आहे. वसई, विरार, नालासोपारा व नायगाव शहरे, तसेच ग्रामीण भागातील गावांचा महापालिकेत समावेश आहे. यंदा समाधानकारक पाऊस आल्याने धरणात साठा झाला, परंतु नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे याकरिता प्रभाग समितीअंतर्गत नियोजन करून वितरित करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने प्रभागानुसार वेळापत्रक जाहीर केले आहे.

एप्रिल महिन्यातही पाण्याचे वेळापत्रक महापालिकेने जाहीर केले होते. त्यामुळे काही प्रभागात दिवसाला तीन तास पाणी वितरित केले गेले; परंतु लोकसंख्येच्या मानाने हे पाणी अपुरे होते. त्यामुळे नागरिकांना महागड्या पाण्याच्या बाटल्या, तसेच हजारो रुपये मोजून टँकरने पाणी मागवावे लागले. पाणीपट्टी व अतिरिक्त खर्च असा भार नागरिकांना सहन करावा लागला होता, तीच परिस्थिती पुन्हा येण्याची भीती निर्माण झाली आहे.

पाणीपुरवठ्यात समस्या कायम
एकीकडे पावसामुळे पम्पिंग स्टेशनमध्ये गाळ साचल्याने जुलै महिन्यात गढूळ पाण्याचा सामना नागरिकांना करावा लागला होता. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणी वितरणावर परिणाम झाला होता. अशातच महागड्या टॅंकरचा आधार घ्यावा लागला. त्यातच नव्याने वेळापत्रक जाहीर केले असल्याने पुन्हा कमी तास व अनियमित पाणी मिळणार आहे.

पाणीपुरवठ्याचे नियोजन
वार प्रभाग समिती झोन
सोमवार - जी, एच, आय - नवघर माणिकपूर , वसई
मंगळवार - बी, डी, एफ - नालासोपारा पूर्व
बुधवार - ए - विरार पश्चिम
गुरुवार - ई - नालासोपारा पश्चिम
शुक्रवार - सी, बी - विरार पूर्व

पाणीपुरवठा सुरळित होण्यासाठी होण्यासाठी नागरिकांककडून महापालिका कर वसूल करते. पावसाळ्यात एक दिवस पाणीपुरवठा होणार नसेल, तर उन्हाळ्यातील पुरवठ्याचा विचार करणे अशक्य आहे.
- सागर परब, नागरिक, वसई

वसई-विरार शहरातील नऊ प्रभागांत आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. धरणात उपलब्ध असलेल्या साठ्यानुसार पाण्याचे नियोजन करून त्यानुसार वितरित केले जाईल. नागरिकांना मुबलक पाणी मिळेल.
- अजिंक्य बगाडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91414 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..