पालिकेचे स्पष्टीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेचे स्पष्टीकरण
पालिकेचे स्पष्टीकरण

पालिकेचे स्पष्टीकरण

sakal_logo
By

केईएम रुग्णालयात अतिरिक्त खाटांची सुविधा
पालिकेचे स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : पालिकेचे केईएम रुग्णालय सध्या रुग्णांनी भरले असून गैरसोय टाळण्यासाठी रुग्णालयात अतिरिक्त खाटांची सुविधा केल्याचे स्पष्टीकरण पालिकेने दिले आहे. केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दर वर्षीप्रमाणे यंदाही साथीच्या रुग्णांमुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढली आहे.
दररोज सुमारे ६५ ते ७५ रुग्ण भरती होत आहेत. त्यामध्ये साधारण १५ रुग्ण हे तापामुळे भरती होतात. हा अतिरिक्त रुग्णसंख्येचा ताण लक्षात घेता सर्व वैद्यकीय वॉर्डमध्ये १० खाटा वाढवण्यात आल्या आहेत. तसेच आवश्यकता भासल्यास इतर विभागातील रिक्त खाटांचा वापरही करण्यात येईल. तसेच, सद्यस्थितीत रुग्णांना खाटा देणे शक्य आहे. दरम्यान, औषधे आणि गरज भासल्यास व्हेंटिलेटर्सची उपलब्धताही आहे. रुग्णालय प्रशासन हे औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या सहकार्याने सर्व रुग्णांना नियमित तसेच तत्काळ सेवा पुरवण्यास सक्षम असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

‘सकाळ’ने २७ जुलै या दिवशी केईएम रुग्णालयाच्या रुग्णसंख्येविषयी बातमी छापली होती. याकडे आता रुग्णालय प्रशासन आणि पालिकेने गांभीर्याने लक्ष दिले असून अतिरिक्त १० खाटांची सुविधा देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91416 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..