पोलिस प्रशासनाविरोधात भारत मुक्ती मोर्चाचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस प्रशासनाविरोधात भारत मुक्ती मोर्चाचे आंदोलन
पोलिस प्रशासनाविरोधात भारत मुक्ती मोर्चाचे आंदोलन

पोलिस प्रशासनाविरोधात भारत मुक्ती मोर्चाचे आंदोलन

sakal_logo
By

बदलापूर, ता. ३ (बातमीदार) : पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे २०१८ साली उसळलेल्या दंगलीनंतर, यामागचे सत्य बाहेर येण्यासाठी बहुजनांनी अनेक आंदोलने केली. मात्र अद्याप बहुजनांना न्याय मिळाला नसल्याचा संताप व्यक्त करण्यासाठी व दंगलीचे सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुणे पोलिस प्रशासनाविरोधात भारत मुक्ती मोर्चा व संबंधित संघटनेच्या वतीने बदलापूर शहरात आंदोलन करण्यात आले.
२०१८ साली भीमा-कोरेगाव येथे झालेल्या दंगलीचे पडसाद तेव्हा देशभरात उमटत होते. या दंगलीमागचे नेमके सत्य काय, यासाठी चौकशी आयोग नेमण्याची मागणी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी राज्यस्तरीय परिवर्तन यात्रेच्या मार्गाने केली. दुसरीकडे विधानसभेत विरोधकांनी फडणवीस सरकारला धारेवर धरले. त्यावेळी दबावामुळे फडणवीस सरकारला चौकशी आयोग नेमणे भाग पडले. मात्र, पुणे पोलिस प्रशासनाने यासाठी चौकशी आयोगाला आवश्यक पुरावे दिले नाहीत, असा आरोप करत व या दंगलीमागचे कारण स्पष्ट व्हावे यासाठी पुन्हा एकदा भारत मुक्ती मोर्चा व संबंधित संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. यासाठी बहुजन मुक्ती पार्टी जिल्हा अध्यक्ष नीलेश येलवे यांच्या नेतृत्वाखाली बहुजन कार्यकर्त्यांनी, बदलापूर पश्चिम बाजारपेठ ते रमेशवाडी येथे उभारलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत रॅली नेत घोषणा दिल्या. या वेळी पुणे पोलिस प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्‍यात आ‍ला. या रॅलीत अनेक महिला व पुरुष सहभागी झाले होते. हे आंदोलन पुढे पाच टप्प्यांत केले जाणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91423 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..