पुतळा हटवण्यावरून दुकानदाराला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुतळा हटवण्यावरून दुकानदाराला मारहाण
पुतळा हटवण्यावरून दुकानदाराला मारहाण

पुतळा हटवण्यावरून दुकानदाराला मारहाण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ ः एका गुजराती दुकादाराने मराठी दुकानदाराला मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. दुकानाच्या बाहेरील पुतळा हटवण्यावरून दोघांत वाद झाला होता. याप्रकरणी मारहाण करणारे दुकानदार देवराज आणि त्यांची मुले मयूर व प्रीतेश यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे, पण अद्याप कोणालाही अटक झाली नाही.

डोंबिवली स्टेशन परिसरात राजेंद्र शेलार आणि देवराज यांची कपड्याची दुकाने आहेत. देवराज यांनी आपल्या दुकानातील पुतळा शेलार यांच्या दुकानासमोर ठेवला होता. तो शेलार यांनी हटवल्याने देवराज आणि त्यांच्या दोन मुलांनी शेलार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांना सोडवण्यासाठी आलेल्या शेलार यांच्या पत्नी सुवर्णा व मेहुणी अंजना यांनाही मारहाण करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91435 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..