नागोठणे एसटी स्थानकाला तलावाचे स्वरूप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागोठणे एसटी स्थानकाला तलावाचे स्वरूप
नागोठणे एसटी स्थानकाला तलावाचे स्वरूप

नागोठणे एसटी स्थानकाला तलावाचे स्वरूप

sakal_logo
By

नागोठणे, ता. १७ (बातमीदार) : नागोठणे बसस्थानकात मोठमोठे खड्डे पडल्याने स्थानकाला तलावाचे स्वरूप आले आहे. स्थानकाच्या आवारात लहान-मोठे दगड निघाले असून बसच्या वर्दळीमुळे ते उडून प्रवासी जखमी होण्याची शक्‍यता आहे. शिवाय स्‍थानकातील खड्डे पार करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
रायगड जिल्ह्यातील नागोठणे हे शहर मध्यवर्ती व वाहतुकीच्या दृष्‍टीने महत्त्वाचे आहे. या ठिकाणाहून मुंबई, ठाणे, वसई, बोरिवली, रोहा, मुरूड, कर्जत, खोपोली, नाशिक, पुणे त्याचबरोबर श्रीवर्धन, चिपळूण, रत्नागिरी तसेच कोकणात जाणाऱ्या बसची वर्दळ असते.
नागोठणे बस स्थानकातून दिवसभरात साधारण १४५ ते १५० स्‍थानिक व लांब पल्‍ल्‍याच्या एसटीच्या फेऱ्या सुरू असतात. त्‍यामुळे दररोज हजारो प्रवासी नागोठणे येथून प्रवास करतात. यंदा पावसाने चांगलाच जोर पकडला असून बस स्‍थानकात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्‍यामुळे प्रवाशांना अक्षरशः कसरत करीत बस पकडावी लागते. समोरून बस आली, तर अंगावर खड्ड्यातील चिखलयुक्‍त पाणी उडत असल्‍याने प्रवाशांचा संताप होतो. त्‍यामुळे बस स्‍थानकातील खड्डे त्‍वरित बुजवण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. खड्ड्यांमुळे खडी, रेतीवर आली आहे. बसच्या वर्दळीमुळे ती प्रवाशांना लागल्‍याने प्रवासी जखमी झाल्‍याचे प्रकारही या ठिकाणी घडले आहेत.

नागोठणे बस स्‍थानकातील खड्डे बुजवण्याबाबत विभागीय कार्यालयात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. विभागीय स्‍थापत्य अभियंता यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर सर्व खड्डे भरण्यात येतील.
- सोनाली कांबळे, रोहा आगार व्यवस्थापक

नागोठणे एसटी स्थानकाची दयनीय अवस्था आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून प्रवाशांसाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. खड्ड्यातील दगड उडून प्रवासी जखमीही झाले आहेत.
- सुमन बडे, नियमित प्रवासी, नागोठणे-कोलेटी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91478 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..