शिक्षणापासून वंचित मुलांना आलिया देतोय शिक्षणाचे धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षणापासून वंचित मुलांना आलिया देतोय शिक्षणाचे धडे
शिक्षणापासून वंचित मुलांना आलिया देतोय शिक्षणाचे धडे

शिक्षणापासून वंचित मुलांना आलिया देतोय शिक्षणाचे धडे

sakal_logo
By

संदीप पंडित : विरार
किन्नर, तृतीय पंथी म्हटले, की त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा होतो; परंतु आज मात्र असाच एक किन्नर फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या वसई पूर्वेकडील खान कंपाऊंड येथील अशा अनेक मुलांसाठी आलिया पवार हा किन्नर पुढे आला आहे. या मुलांना तो मोफत शिक्षण देत आहे. तसेच बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजी उत्तीर्ण झालेल्या आलिया मिलिंद पवार हा आपल्या शिक्षणाचा उपयोग करून या शिक्षणापासून वंचित असलेल्या येथील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
वसई पूर्वेला राहणारा आलिया मिलिंद पवारने गरीब मुलांना मोफत शिकवणी क्लास सुरू केले आहेत. आलियाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली अर्बन महाविद्यालयात आपले बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर आपल्याला योग्य नोकरी मिळेल अशी आशा मनाशी बाळगून कित्येक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केल्यानंतरदेखील पदरी निराशाच पडली. डोक्यावर आईची जबाबदारी असल्याने भीक मागून आणि लोकांना आशीर्वाद देऊन आपला उदरनिर्वाह आलिया करतो; मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोना काळानंतर परिसरातील तब्बल ५० ते ६० मुले शिक्षणापासून वंचित होत चालली असल्याने आपल्या शिक्षणाचा योग्य उपयोग करून या विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षांपासून आलिया मोफत शिक्षण देत आहे. शिक्षणापासून वंचित झालेल्या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी आलियाने त्यांच्याशी खेळायला सुरुवात केली. दोन ते तीन मुलांपासून सुरुवात केल्यानंतर आज दोन सत्रांत झोपडपट्टीतील सुमारे ३० ते ४० मुलांना मोफत शिकवणी आलिया घेत आहे. खान कंपाऊंडमधील बहुतेक लोक हे दैनंदिन रोजगारावर आपले जीवन जगत आहेत. कोरोनामुळे अनेकांच्या हातून रोजगार गेल्यानंतर अनेकांनी आपल्या मुलांना शिक्षणापासून दूर केले आहे. महिन्याला जेमतेम आठ ते १० हजार उत्पन्न असलेल्या पालकांना आपल्या पाल्याची फी भरणेदेखील कठीण होते आहे. त्यामुळे अनेकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठवणे पसंत केले; मात्र त्यांच्या या परिस्थितीचा विचार करून आलियाने या भागातील मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यावर भर दिला आहे.
=========
परिसरातील मुलांना आता शिक्षणाची ओढ लागली आहे. त्यामुळे या परिसरात प्रशासनाने या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय करावी. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय, पण देशातील उद्याचे भविष्य असणाऱ्या मुलांना आजही शिक्षणासाठी वणवण करावी लागते, ही मोठी शोकांतिका आहे.
- आलिया पवार

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91489 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..