रेल्वे भुयारी मार्गात लुटमार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे भुयारी मार्गात लुटमार
रेल्वे भुयारी मार्गात लुटमार

रेल्वे भुयारी मार्गात लुटमार

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर एका दिवसात दोन जबरी लुटीच्या घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत सीवूड्स रेल्वे स्थानकाच्या सबवेमध्ये दोघा लुटारूंनी एका महिलेच्या गळ्यातील १ लाख १५ हजारांचे दागिने लुटले आहेत; तर दुसऱ्या घटनेत तुर्भे रेल्वे स्थानकाच्या सबवेमध्ये एका तरुणीचा मोबाईल, हेडफोन व रोख रक्कम असलेली पर्स खेचण्यात आली आहे.
जुईनगर येथे निरंकारी सत्संगच्या बैठकीला जाण्यासाठी सकाळी पावणेसातच्या सुमारास सीवुड्स येथील दारावे गावात राहणाऱ्या गीता पाटील (५९) या सीवूड्स रेल्वे स्थानकात आल्या होत्या. या वेळी सबवेमधून जात असताना एका लुटारूने गीता पाटील यांच्या हातातील कागद पडल्याचे सांगून लक्ष विचलित करत गळ्यातील १ लाख १५ हजार रुपयांची सोन्याची चेन खेचून सहकाऱ्यांसह पलायन केले; तर तुर्भे रेल्वे स्थानकातून घडलेल्या दुसऱ्या एका घटनेत सबवेमधून फलाटावर लोकल पकडण्यासाठी जाणाऱ्या तरुणीची पर्स खेचून त्यातील ७० हजारांचा फोन तसेच हेडफोन, आधार कार्ड आणि रोख १५०० रुपयांची रक्कम चोरण्यात आली आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी वाशी रेल्वे पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, या प्रकारांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91490 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..