बेकायदा जुगार प्रकरणात सात जण ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदा जुगार प्रकरणात सात जण ताब्यात
बेकायदा जुगार प्रकरणात सात जण ताब्यात

बेकायदा जुगार प्रकरणात सात जण ताब्यात

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : सीबीडी सेक्टर- १५ मधील कॉर्पोरेट हॉटेलच्या रूममध्ये बेकायदा जुगार खेळणाऱ्या सात जणांवर सीबीडी पोलिसांनी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी जून महिन्यातदेखील अशाच प्रकारे कारवाई करण्यात आली होती.
सीबीडी सेक्टर-१५ मधील कॉर्पोरेट हॉटेलमध्ये बी-३०६ क्रमांकाच्या रूममध्ये बेकायदा जुगाराचा क्लब चालवण्यात येत असल्याची माहिती सीबीडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक सचिन मोरे यांच्या पथकाने सोमवारी रात्री ८.४५ च्या सुमारास कॉर्पोरेट हॉटेलमधील बी-३०६ क्रमांकाच्या रूमवर छापा मारला. या वेळी पैसे लावून पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या पाच जणांसह क्लब चालवणाऱ्या गलशेर खानला महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91493 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..