
आठवडा बाजारांवर गावगुडांची दहशत
खारघर, ता. ४ (बातमीदार) : खारघर-तळोजा हद्दीत बेकायदा आठवडी बाजार भरविले जात आहेत. या बाजारांवर कारवाई करण्यात महापालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील गावगुंड विक्रेत्यांकडून वसुली करत आहेत. तसेच या बाजारांमुळे होणारी गर्दी, चोऱ्या तसेच कचऱ्यामुळे परिसरातील नागरिक हैराण आहेत.
खारघर, सेक्टर ४० मध्ये सिडकोने उभारलेल्या गृह प्रकल्पाच्या समोरील परिसरातील मोकळे भूखंड, मैदाने आणि रस्त्यावर आठवडी बाजार भरवले जात आहे. या बाजारात गोवंडी, मानखुर्द, मुंबईतील व्यापारी कपडे, घरगुती वस्तू, भाजीपाला, खेळणी, चप्पल, शोभेच्या वस्तू, कटलरी आदी वस्तू विक्रीसाठी घेऊन येतात. त्यामुळे राहत्या परिसरात सर्व काही उपलब्ध होत असल्याने नागरिकांचाही प्रतिसाद मिळत आहे; पण महापालिकेच्या परवानगीविना सुरू असलेल्या या बाजारांना काही गावगुडांचा वरदहस्त असल्याची माहिती समोर येत आहे. या गावगुंडांकडून पन्नास ते शंभर रुपयांत पोलिस, सिडको आणि पालिकेकडून केल्या जाणाऱ्या कारवाईची जबाबदारी घेतली जात असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. त्यामुळे खारघर परिसरात अशा अनधिकृत बाजारांना अक्षरशः ऊत आला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91506 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..