जिल्ह्यामध्ये चार लाख ८० हजार तिरंगा ध्वज फडकणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यामध्ये चार लाख ८० हजार तिरंगा ध्वज फडकणार
जिल्ह्यामध्ये चार लाख ८० हजार तिरंगा ध्वज फडकणार

जिल्ह्यामध्ये चार लाख ८० हजार तिरंगा ध्वज फडकणार

sakal_logo
By

पालघर, ता. ४ (बातमीदार) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत पालघर जिल्ह्यामध्ये चार लाख ८० हजार घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले. अमृत महोत्सवाचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये प्रत्येक ग्रामस्थांच्या घरावर तिरंगा ध्वज लावण्यात येणार आहे. महापालिका व जिल्ह्यातील सर्व नगरपालिकाअंतर्गत येणाऱ्या घरावर ध्वज लावण्याची जबाबदारी त्या त्या कार्यालय प्रमुखावर असेल. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी समन्वय ठेऊन आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व घरावर तिरंगा ध्वज लावण्यासाठी नियोजन करायचे आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी बोडके यांनी दिले.

या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सहायक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, आयुषी सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा शल्यचिकित्सक संजय बोदाडे आदी अधिकारी उपस्थित होते.

ड्रोनद्वारे चित्रीकरण
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर तिरंगा ध्वजाचे स्टीकर लावण्यात यावे. आरोग्य विभागाने सर्व रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्र, तसेच कर्मचारी वसाहत परिसरात तिरंगा ध्वज लावावा. सर्व कार्यालय प्रमुखांनी रितसर परवानगी घेऊन कार्यक्षेत्रात ड्रोनद्वारे चित्रीकरण करावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91510 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top