द्रुतगती मार्गावरील बेरीकेड्स अस्‍ताव्‍यस्‍त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

द्रुतगती मार्गावरील बेरीकेड्स अस्‍ताव्‍यस्‍त
द्रुतगती मार्गावरील बेरीकेड्स अस्‍ताव्‍यस्‍त

द्रुतगती मार्गावरील बेरीकेड्स अस्‍ताव्‍यस्‍त

sakal_logo
By

कांदिवली, ता. ४ (बातमीदार) ः कांदिवली पूर्वेला आशानगर व साई धाम मंदिरासमोरील द्रुतगती मार्गावर नाकाबंदीचे बेरिकेड्स अस्‍ताव्‍यस्‍त पडलेले आहेत. याकडे पालिका तसेच पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने या बेरिकेड्समुळे प्रवासी व वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कांदिवली पूर्वेला साई धाम मंदिरासमोर पादचारी भुयारी मार्ग आहे. द्रुतगती मार्गाला लागून असलेल्या भुयारी मार्गाच्या भिंतींना तसेच आजूबाजूला लोखंडी बेरिकेड्स पडलेले आहेत. द्रुतगती मार्गावर वाहनांसह प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये–जा असते. नाकाबंदीसाठी पोलिसांकडून वापरण्यात येणारे लोखंडी बेरिकेड्स, नाकाबंदीचा १५ फूट उंचीचा लोखंडी फलक रस्त्यावरच आडवा टाकण्यात आला आहे. या बेरिकेड्समुळे येथे पावसाळ्यात चिखल-गाळ साठतो. तसेच कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. वाहनचालकांना यामुळे अपघातजन्य परिस्थितीचा सामना करतच प्रवास करावा लागत आहे. याकडे पालिका, पोलिस, एमएमआरडीए व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले आहे. बेरिकेडस हटवून मार्ग मोकळा करावा, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. याबाबत समतानगर पोलिस ठाणे यांच्याशी संपर्क साधला असता फोन उचलला गेला नाही.

संबंधित अभियंता व अधिकाऱ्यांस कळवून बेरिकेड्स काढून घेण्यात येतील.
– समीर सानप, सहायक अभियंता आर दक्षिण

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91526 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..