पान ४ पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ४ पट्टा
पान ४ पट्टा

पान ४ पट्टा

sakal_logo
By

महापालिकेचे ‘घरोघरी तिरंगा’अभियान
नवीन पनवेल (वार्ताहर) ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ अभियानात नागरिकांनी घर, कार्यालयावर १३ ते १५ ऑगस्टदरम्यान राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. या अनोख्या उपक्रमासाठी पनवेलकरांसाठी पनवेल तहसील कार्यालयात ध्वजविक्री केंद्र सुरू केल्याची माहिती तहसीलदार विजय तळेकर यांनी दिली आहे. स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ७५ वर्षांच्या गौरवशाली परंपरेप्रति प्रत्येकाच्या मनात देशाभिमान जागृत करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
नेरूळमध्ये ‘पोस्टाच्या योजना आपल्या दारी’
जुईनगर (बातमीदार) : पोस्टच्या वतीने विविध अपघाती विम्यासह वेगवेगळ्या जनसेवेच्या योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची नेरूळ व जुईनगरमधील नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांच्या वतीने नेरूळ, सेक्टर २ येथील कार्यालयात ‘पोस्टाच्या योजना आपल्या दारी’ हे अभियान घेण्यात आले. या वेळी १८ ते ६५ वयोगटासाठीच्या विविध अपघात विमा योजनांबाबत माहिती देण्यात आली.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी सोनवणे
जुईनगर (बातमीदार) ः महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची संघटनात्मक पुनर्बांधणी केली जात आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. काँग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा सरचिटणीसपदी विश्वनाथ सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली; तर सानपाडा जुईनगर प्रभाग ३१ (अ)च्या प्रभारी अध्यक्षपदाची जबाबदारी महानंद रामराजे यांच्यावर सोपविली आहे. या दोघांना काँग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी नियुक्तीचे पत्र दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91528 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top