संकटमोचन दक्षिणमुखी हनुमान मंदिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संकटमोचन दक्षिणमुखी हनुमान मंदिर
संकटमोचन दक्षिणमुखी हनुमान मंदिर

संकटमोचन दक्षिणमुखी हनुमान मंदिर

sakal_logo
By

वसई पश्चिम भागातील दिवाणमान गावात संकटमोचन दक्षिणमुखी हनुमान मंदिर असून तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराच्या विकासासाठी गावकऱ्यांचा सहभाग नेहमीच लाभला आहे. या मंदिराला ३८ वर्षे पूर्ण झाली असून सामाजिक एकोपा जपण्याचे काम केले जाते.

दिवाणमान येथे प्रामुख्याने आगरी समाज वास्तव्यास आहे. दक्षिणमुखी हनुमानासह गणपती, संतोषी माता, राधाकृष्ण, साईबाबा अशा देव-देवतांच्या मूर्ती याठिकाणी आहेत. त्यामुळे वर्षभर विविध कार्यक्रमांमुळे धार्मिक वातावरणनिर्मिती झाल्याने भाविकांना प्रफुल्लित करत असते. यंदाच्या श्रावण मासानिमित्त विविध भोग कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून दर शनिवारी फुलांची वाडी, फळांची वाडी, मिठाईचा नैवेद्य व चॉकलेट भोग, फळांची आरास असा उपक्रम हाती घेतला आहे. तसेच ''श्री राम जय जय राम'' हा त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करण्यात येणार आहे. मयुरेश साठे हे या मंदिराचे पुजारी असून सकाळी हनुमानाची पूजा-आरती केली जाते. या मंदिरातील बजरंगबलीचे दर्शन घेण्यासाठी श्रावण महिना, हनुमान जयंती, नवरात्रोत्सवात भाविकांची रिघ मोठ्या प्रमाणात दिसून येते. येथील वातावरण शांत असल्याने भाविक भक्तीमार्गात तल्लीन होत असतात. हरिपाठ, हनुमान चालिसा पठण, राम नामाचा जप, राधाकृष्णाची आराधना, संतोषी मातेचे व्रत करण्यासाठी भाविकांची रेलचेल नेहमीच पाहावयास मिळते.

मंदिराच्या प्रत्येक कामासाठी ग्रामस्थ एकवटतात. तसेच लहान मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध खेळांच्या व कलेच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यापुढे विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत, अशी माहिती ग्रामस्थ संजय पाटील यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91534 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..