जागा निश्चित मात्र निधीअभावी ५ प्रकल्प रखडणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागा निश्चित मात्र निधीअभावी ५ प्रकल्प रखडणार
जागा निश्चित मात्र निधीअभावी ५ प्रकल्प रखडणार

जागा निश्चित मात्र निधीअभावी ५ प्रकल्प रखडणार

sakal_logo
By

वसई, ता.४ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेत सांडपाणी प्रकल्प रखडल्याने जलप्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. याच प्रकरणावरून हरित लवादाने ११३ कोटी दंड ठोठावला. या विरोधात पालिका प्रशासनाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. असे असताना सांडपाणी प्रकल्पासाठी धावपळ सुरू झाली असून खासदार राजेंद्र गावित, आयुक्त अनिलकुमार पवार यांनी नुकतीच दिल्ली वारी केली करत प्रकल्पाला निधी मिळविण्याचा प्रयत्न केला. पण हा निधी केवळ दोन प्रकल्प उभारणीत वापरता येईल इतकाच आहे, त्यामुळे उर्वरित ५ प्रकल्प रखडणार असून जलप्रदूषण रोखणार, अशी डोकेदुखी प्रशासनासमोर आली आहे.
वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या पंचवीस लाख इतकी आहे. पालिका क्षेत्रात सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याने ते तसेच खाडीत सोडले जाते. त्यामुळे जलप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होत आहे. सध्या नालासोपारा पूर्व व पश्चिम या दोनच सांडपाणी प्रकल्पाचा प्रस्ताव तयार केला आहे. नालासोपारा पूर्वेला २१२ कोटी, तर पश्चिमेला ४९२ कोटी इतका अंदाजित खर्च होणार आहे. केंद्राकडून पाणीपुरवठा व सांडपाणी प्रकल्पासाठी १२०० कोटी निधी देण्यासाठी हिरवा कंदील मिळाला असला तरी येथील ७०४ कोटी हे या दोन सांडपाणी प्रकल्पासाठी खर्च होणार आहेत. त्यामुळे पाच प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासणार आहे.
वसई-विरार महापालिकेला सद्यस्थितीत २३१ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे; तर १५६ दशलक्ष लिटर इतके सांडपाणी निर्माण होत. सध्या बोळींज येथे असलेल्या सांडपाणी प्रकल्पात केवळ ७७ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. या प्रकल्पासाठी १२७ कोटी खर्च करण्यात आला. उर्वरित पाणी प्रक्रियेविना खाडीत जाते. महापालिका प्रशासनाने वसई-विरार शहरात सात ठिकाणी सांडपाणी प्रकल्पाची घोषणा केली आहे. लवादाने दंडनीय कारवाई केल्यावर पालिकेची तारांबळ उडाली व याकडे गांभीर्याने लक्ष घातले गेले व नालासोपारा येथील पूर्व-पश्चिमचा प्रकल्प उभारण्याचा निश्चय केला.
----------------------
वसई-विरार शहरातील सांडपाण्याचा प्रश्न निकाली निघावा, तसेच या पाण्याचा शहरात पुनर्वापर करता यावा म्हणून केंद्राकडे प्रकल्प उभारणीसाठी निधीची मागणी केली. यावर केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
---------------------
लोकसंख्येनुसार दोन प्रकल्प पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणार आहेत, तर वसई-विरार शहरातील सात ठिकाणी प्रकल्पाचा विचार आहे. दोन प्रकल्प उभारणीसाठी ७०४ कोटी निधी लागणार असून त्याचे काम हाती घेतले जाईल. त्यानंतर पुढील पाच प्रकल्पांसाठी निधीची उपलब्धता झाल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- अनिलकुमार पवार, प्रशासक तथा महापालिका आयुक्त

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91542 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..