महापालिकेसाठी तिसऱ्यांदा सोडत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेसाठी तिसऱ्यांदा सोडत
महापालिकेसाठी तिसऱ्यांदा सोडत

महापालिकेसाठी तिसऱ्यांदा सोडत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : शिंदे-फडणवीस सरकारने याआधीच्या २०१७ च्या आरक्षणानुसारच यंदाच्या महापालिका निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच याआधीच्या २३६ प्रभागांऐवजी २२७ प्रभागांनुसारच निवडणूक होणार आहे. आतापर्यंत मुंबई महापालिकेने निवडणुकीसाठी दोन वेळा आरक्षण सोडत घेतली होती; परंतु आता सरकारच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा नव्याने सोडत प्रक्रिया राबवावी लागणार आहे.
दर १० वर्षांनी जनगणना होणे आवश्यक आहे. २०११ मध्ये जनगणना झाल्यानंतर २०१२ व २०१७ मध्ये पालिका निवडणूक घेण्यात आल्या; मात्र त्यानंतर २०२१ मध्ये जनगणना होणे गरजेचे होते. मात्र जनगणना न घेता लोकसंख्यावाढ झाल्याचे सांगत नऊ नवीन प्रभाग आपल्या सोईने वाढवल्याचा आरोप भाजप व काँग्रेसकडून केला गेला. शहरी भागातील लोकसंख्या कमी होऊन उपनगरांत लोकसंख्या वाढल्याने हे वॉर्ड वाढवल्याचे कारण सांगण्यात आले; मात्र याला काहीही आधार नाही, असे सांगत भाजपने विरोध केला होता. त्यामुळे सत्तांतर झाल्यानंतर भाजपने सदस्यसंख्येत सुधारणा करून हे नवीन प्रभाग रद्द करून २२७ प्रभाग संख्या कायम ठेवली आहे.
मुंबई महापालिकेने याआधी ३१ मे रोजी २३६ प्रभागांसाठी सोडत घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २३६ प्रभागांसाठी ओबीसी आरक्षणासह २९ जुलै रोजी सोडत घेण्यात आली; परंतु ३ ऑगस्टला राज्य सरकारने घेतलेल्या कॅबिनेट निर्णयामुळे आता पुन्हा २२७ प्रभागांसाठी आरक्षणाची सोडत प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेकडून तिसऱ्यांदा सोडत प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
...
आम्ही महापालिकेतील सूचना आणि हरकतींवर सुनावणी घेण्याची मागणी केली होती; पण ही मागणी अमान्य करण्यात आली. तसेच एका विशिष्ट पक्षाला फायदा होण्यासाठी प्रभागरचना करण्यात आली होती. त्यामुळेच  या प्रकाराविरोधात सर्वांत आधी आम्ही भूमिका घेतली होती. 
- प्रभाकर शिंदे, मुंबई महापालिकेतील माजी गटनेते, भाजप
...
शिवसेनेने प्रभागांची संख्या वाढवण्याचा घेतलेला निर्णय हा लोकशाहीला धरून नव्हता. आघाडीत असताना हा निर्णय घटकपक्षांचा अपमान करण्यासारखा होता. मुंबईत काँग्रेसला नामशेष करण्याचा हा प्रयत्न होता. हा काँग्रेसचा आणि मुंबईकरांचा मोठा विजय आहे.
- मिलिंद देवरा, नेते, काँग्रेस

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91555 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top