मुंबईत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
मुंबईत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

मुंबईत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : मुंबईकरांना गुरुवारी (ता. ४) अनेक मार्गांवर ट्रॅफिक जाम आणि संथ वाहतूक या समस्येला सामोरे जावे लागले. मुंबई वाहतूक पोलिसांनी पूर्वनिश्चित अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येणार असल्याने गुरुवारी वाहनांची वाहतूक मंद होण्याची शक्यता वर्तवली होती. याबाबत मुंबई वाहतूक पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर मार्गदर्शक सूचना जारी केली होती.
मुंबई वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या सूचनामध्ये मुंबईत ४ ऑगस्ट रोजी पूर्वनियोजित वेळापत्रकामुळे मुबईच्या महत्त्वाच्या रस्त्यांवर कोंडी होण्याची शक्यता पाहता मुंबईकरांना पर्यायी मार्ग वापरण्यास सांगितले होते. गुरुवारी दक्षिण मुंबईतील एनसीपीएदरम्यान, वाशी ईस्टर्न फ्रीवे आणि एनसीपीए ते दिंडोशी या पश्चिम द्रुतगती मार्गावर सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत वाहतूक कोंडी झाली. दुपारी ४ ते संध्याकाळपर्यंत वाहतूक संथ गतीने होत होती. यासोबतच वाहतूक पोलिसांनी मुंबईकरांना प्रवासाचे नियोजन करण्याचे आव्हान केले होते.
...
बुधवारीसुद्धा वाहतूक कोंडी
मुंबईत बुधवारी (ता. ३) ऑगस्टलाही अतिमहत्त्वाच्या व्यक्ती वाहतुकीवर परिणाम झाला होता. सकाळी १०:३० ते ११:३० सांताक्रूझ विमानतळ, पश्चिम द्रुतगती मार्गी ते मलबार हिलदरम्यान आणि दुपारी १२:३० पर्यंत मलबार हिल ते रीगल सर्कलदरम्यान वाहतूक संथ होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91586 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top