महापालिकेचा फेरीवाल्यांवर आसूड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेचा फेरीवाल्यांवर आसूड
महापालिकेचा फेरीवाल्यांवर आसूड

महापालिकेचा फेरीवाल्यांवर आसूड

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ४ : रस्ता आणि पदपथावर ठाण मांडून बसलेल्या बेकायदा फेरीवाल्यांवर नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने गुरुवारी (ता. ५) कारवाई केली. या वेळी अतिक्रमणविरोधी पथकाचे उपायुक्त अमरीश पटनिगिरे यांच्या उपस्थितीत नेरूळ रेल्वे स्थानक, तुर्भे, एपीएमसी मार्केट परिसरातील २०० पेक्षा जास्त फेरीवाल्यांना हटवण्यात आले.
नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत फेरीवाल्यांचा उपद्रव वाढला आहे. बेलापूरपासून ते अगदी वाशी आणि ऐरोली रेल्वे स्थानकांच्या दुतर्फा फेरीवाल्यांचे बस्तान आहे. फेरीवाल्यांच्या या वाढत्या उपद्रवामुळे रेल्वे स्थानक परिसरातील सर्व रस्ते आणि पदपथ व्यापून गेले आहेत. बहुतांश ठिकाणी फेरीवाल्यांकडून विभाग कार्यालयातील अधिकारी आणि काही स्थानिक राजकीय गुंडांकडून पैसे वसूल केले जात असल्याच्या तक्रारी आल्याने नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी याबाबत नाराजीदेखील व्यक्त केली होती. अखेर अतिक्रमणविरोधी पथकाचे उपायुक्त अमरीश पटनिगिरे यांनी रस्त्यावर उतरून नेरूळ रेल्वे स्थानक, एपीएमसी मार्केटमधील क्रोमा सेंटरजवळ, तुर्भे आधी परिसरातील २०० पेक्षा जास्त फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे.
----
फेरीवाले हटाव मोहीम
नवी मुंबई महापालिकेने तयार केलेले रस्ते हे वाहनांसाठी आणि पदपथ हे पादचाऱ्यांच्या सोयीसाठी आहेत. यावर अतिक्रमण करून त्यांच्या अधिकारात बाधा आणत असल्यास महापालिका हयगय करणार नाही. महापालिकेच्या कारवाईत अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
- अमरीश पटनिगिरे, उपायुक्त, नवी मुंबई महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91594 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top