पाचवीतील मुलीची आत्महत्या, | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाचवीतील मुलीची आत्महत्या,
पाचवीतील मुलीची आत्महत्या,

पाचवीतील मुलीची आत्महत्या,

sakal_logo
By

रबाळे येथे पाचवीतील मुलीची आत्महत्या
अल्पवयीन मुलाच्या धमकीला घाबरुन आत्महत्या केल्याचा संशय

नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : रबाळे एमआयडीसीतील संभाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका ११ वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसले, तरी त्याच भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाकडून या मुलीला धमकी देण्यात येत असल्याने या मुलीने घाबरून आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात आहे.
रबाळे एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
या घटनेतील ११ वर्षीय मुलगी रबाळे एमआयडीसीतील संभाजीनगर परिसरात आई-वडील व बहीण-भावासह राहावयास होती. तसेच ती इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत होती. मृत मुलगी मागील काही दिवसांपासून तणावाखाली आल्याने ती शाळेतदेखील जात नव्हती. यातच बुधवारी सायंकाळी घरात कुणीही नसताना या मुलीने ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास आई-वडील कामावरून घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रबाळे एमआयडीसी पोलिसांनीदेखील घटनास्थळी धाव घेऊन मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला.
सदर मुलगी मागील काही दिवसांपासून तणावाखाली आल्याने ती शाळेत जात नसल्याने वडिलांकडून तिला ओरडा मिळाला होता. याच कारणावरून मुलीने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता मृत मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे व्यक्त केली आहे; मात्र मृत मुलीला त्याच परिसरात राहणारा एक अल्पवयीन मुलगा गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होता. तसेच त्या मुलाने या मुलीला मारण्याची धमकीदेखील दिली होती. त्यामुळे सदर मुलगी घाबरून शाळेतदेखील जात नव्हती. यामुळे तणावाखाली आलेल्या या मुलीने बुधवारी रात्री घरात कुणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्या परिसरातील रहिवाशांकडून बोलले जात आहे. त्यानुसार पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91595 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..